-
अंकिता वालावलकर ही महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि ‘बिग बॉस मराठी ५’ची माजी स्पर्धक आहे.
-
सोशल मीडियावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या अंकिताने नुकतीच शेतातील भात कापणीचा अनोखा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
पहिल्याच भात कापणीच्या अनुभवाने आणि चिखलातील मेहनतीमुळे तिचे कपडे माखलेले दिसत आहे.
-
या फोटोंना कॅप्शन देताना तिने लिहिले आहे, “अलिबागची सून झोलाला शिकली… जे माझ्या हातात आहे, त्याला आखा म्हणतात आणि त्याने शेतात मासे पकडायला जाणे म्हणजे झोलाला जाणे म्हणतात. माझा पहिलाच भात कापणीचा अनुभव… जरी मी कोकणातली असले तरी आम्ही coastal region मधे लहानाचे मोठे झालो..”
-
गावातील परिस्थिती स्पष्ट करीत तिने सांगितले, “आमच्या गावात शेती नाही… नाय तर लगेच कमेंटी मारुक येशात हेका येणा नाय नी ह्या नाय नी ता नाय.”
-
शेतात काम केल्यानंतर अंकिता लहान मुलांबरोबर आणि महिलांबरोबर जमिनीवर बसून फोटो काढताना दिसत आहे.
-
अंकिताची ही पोस्ट सध्या तिच्या चाहत्यांमध्ये खूप पसंत केली जात असून, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)
काटा किर्रर्रर्र नाचलीस गं… ‘लिंबोणीचं लिंबू’ गाण्यावर तरूणीचा मनमोहक डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक