-
Diwali 2026: दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, फटाक्यांची आतषबाजी आणि खमंग फराळाची मेजवानी!
-
हा प्रकाशाचा उत्सव सर्वांच्याच आयुष्यात नवी आशा आणि भरभरून आनंद घेऊन येतो.
-
याच खास उत्सवाचे औचित्य साधत छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कोमल कुंभारने (Komal Kumbhar) एक खास दिवाळी स्पेशल फोटोशूट केले आहे.
-
कोमलने या फोटोशूटसाठी आकर्षक काळ्या रंगाची नऊवारी पैठणी साडी परिधान केली असून, त्यावर पारंपरिक दागिन्यांचा सुरेख साज शृंगार केला आहे.
-
काळ्या नऊवारीतील तिचा हा मराठमोळा आणि मनमोहक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या सुंदर लूकबरोबरच कोमलने आशा भोसले यांच्या प्रसिद्ध ‘घन रानी साजणा’ या गाण्यावर एक सुंदर रील व्हिडिओ तयार केला असून, त्याला ‘शृंगार’ असे कॅप्शन दिले आहे.
-
यंदा दिवाळी ५ नोव्हेंबर रोजी वसूबारसने सुरू होत असून ११ नोव्हेंबरला भाऊबीजेने सांगता होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कोमल कुंभार/इन्स्टाग्राम)
काटा किर्रर्रर्र नाचलीस गं… ‘लिंबोणीचं लिंबू’ गाण्यावर तरूणीचा मनमोहक डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक