-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री मधुराणी गोखलेचा (Madhurani Gokhale) ‘कापूसकोंडा’ (Kapuskoonda Movie) हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मधुराणीने सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
या चित्रपटात मधुराणीसोबत ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, भूषण पाटील, अक्षता पाडगावकर आणि जान्हवी तांबत अशा कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळत आहे.
-
सत्यघटनेवर आधारित असलेल्या ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे.
-
‘कोण होणार करोडपती’च्या मंचासाठी मधुराणीने गुलाबी रंगाची सुंदर सिल्क साडी आणि त्यावर चंदेरी रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता.
-
या गुलाबी सिल्क साडीतील लूकवर मधुराणीने आकर्षक मेकअप करून छान वेणी बांधली होती.
-
‘कोण होणार करोडपती’च्या या पर्वाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS