-
Zee Marathi Awards 2026: कलाकारांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या लोकप्रियतेचा गौरव करणारा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ हा छोट्या पडद्यावरील एक मानाचा सोहळा आहे.
-
या पुरस्कार सोहळ्याला मराठी अभिनेत्री केतकी कुलकर्णीने (Ketaki Kulkarni) विशेष हजेरी लावली होती.
-
केतकी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’मध्ये (Kamali TV Serial) काम करत आहे.
-
या मालिकेत केतकी ‘अनिका’ ही नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
-
या पुरस्कार सोहळ्यात केतकीच्या दाक्षिणात्य लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
यावेळी केतकीने निळ्या व गुलाबी रंगाच्या साडीपासून तयार केलेला लेहेंगा परिधान केला होता, त्यावर तिने केलेला दाक्षिणात्य दागिन्यांचा साज उठून दिसत होता.
-
‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’चा हा दिमाखदार सोहळा ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहता येईल.
-
(सर्व फोटो सौजन्य : केतकी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
काटा किर्रर्रर्र नाचलीस गं… ‘लिंबोणीचं लिंबू’ गाण्यावर तरूणीचा मनमोहक डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक