-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरात हास्याची उधळण करत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे.
-
गेल्या आठ वर्षांत या कार्यक्रमाने केवळ एक विनोदी शो म्हणून नव्हे, तर प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आपली खास ओळख निर्माण केली आहे.
-
या मालिकेतील पात्रे आणि संवाद आता लोकांच्या रोजच्या बोलण्यातही सहजपणे वापरले जातात.
-
आठ वर्षांच्या या यशस्वी प्रवासात या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवून घराघरात ओळख मिळवून दिली.
-
सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम अमेरिकेच्या बोस्टन दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान अभिनेत्री चेतना भटने (Chetana Bhat) एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये चेतनाने पांढऱ्या व हिरव्या रंगाचा स्ट्राइप्ड शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे.
-
विशेष म्हणजे, चेतनाचे हे सुंदर फोटोशूट तिचे सहकलाकार शिवाली परब आणि पृथ्वीक प्रताप यांनी केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चेतना भट/इन्स्टाग्राम)
काटा किर्रर्रर्र नाचलीस गं… ‘लिंबोणीचं लिंबू’ गाण्यावर तरूणीचा मनमोहक डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक