-
निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या मराठी व हिंदी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेत्री आहेत.
-
नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत निवेदिता यांनी आपल्या सशक्त अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
निवेदिता सराफ यांनी नुकतेच सोशल मीडियावर श्री स्वामी समर्थ यांच्या ‘अर्धनारीश्वर’ रूपातील काही विशेष फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करत त्यांनी “अशक्य ही शक्य करतील स्वामी… स्वामींच्या इच्छेनेच हा दिव्य लूक साकारण्याचं भाग्य लाभलं… खरंच धन्य वाटतंय!” असे भावूक कॅप्शन दिले आहे.
-
निवेदिता यांनी शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “तेजस्वी रूप”, “अतिशय दैवी लूक”, “अंगावर अक्षरशः काटा आला” आणि “हे रूप पाहताच राहावं वाटतं” अशा भरभरून प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
-
निवेदिता सराफ सध्या झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ (Krushnaichya Leki TV Serial) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत.
-
मुलगा-मुलगी भेद, स्त्रीचा स्वाभिमान, शिक्षणाचे महत्त्व आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष यांसारख्या सामाजिक विषयांवर ही मालिका भाष्य करते.
-
(सर्व फोटो सौजन्य : निवेदिता सराफ/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव