-
मराठी अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडेने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
-
तिच्या सहजसुंदर अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. गौतमी सोशल मीडियावर नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
नुकतेच तिने सोशल मीडियावर आपले काही अतिशय सुंदर आणि आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गौतमीने सुंदर नक्षीकाम असलेली पारंपरिक साडी परिधान केली आहे. ब्लॅक अँड व्हाईट अंदाजात काढलेले हे फोटो तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहेत.
-
कपाळावर छोटीशी टिकली आणि चेहऱ्यावरील हास्य तिच्या या साडी लूकला अधिकच मनमोहक बनवत आहे. तिचा हा साडीतील लूक चाहत्यांना आवडला असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
या सुंदर फोटोंना शेअर करताना गौतमीने ‘छोटीसी बात’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
गौतमीच्या या लूकने सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याची आणि खास शैलीची चर्चा घडवून आणली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:गौतमी देशपांडे/इन्स्टाग्राम)
‘ये मेरी भाभी है’, सुलभा आर्य आहेत शबाना आझमींच्या वहिनी! नणंद-वहिनीचं नातं आहे खूपच गोड, भावुक किस्सा सांगत म्हणाल्या…