-
ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
-
गेल्या अडीच दशकांपासून त्यांनी आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच ऐश्वर्या यांनी साडीतील एक सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे, जे सध्या तुफान व्हायरल होत आहे.
-
या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी निळ्या रंगाची पारंपरिक इरकल सिल्क साडी परिधान केली आहे.
-
या लूकला अधिक खास बनवण्यासाठी ऐश्वर्या यांनी कमळ बुगडी, तांदूळ मणी हार, पारंपरिक नथ आणि मंगळसूत्र अशा दागिन्यांचा सुरेख साज केला आहे.
-
ऐश्वर्या सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत.
-
या मालिकेत ऐश्वर्या या ‘शिक्षिका नाईक बाई’ (Aamchya Ladkya Naik Bai TV Serial) ही मध्यवर्ती आणि प्रभावी भूमिका साकारत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”