-
मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे ही तिच्या उत्कृष्ट अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
श्रेया बुगडे हिने उज्जैन येथील प्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले आहे.
-
विशेष म्हणजे श्रेया या धार्मिक प्रवासाला एकटी गेली नसून तिच्या बालपणीच्या खास मैत्रिणीबरोबर उज्जैनला गेली आहे.
-
या प्रवासाचे काही सुंदर फोटो आणि व्हिडीओ श्रेयाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रेया आणि तिची मैत्रीण पारंपरिक कपड्यांमध्ये अतिशय सुंदर व प्रसन्न रूपात पाहायला मिळत आहेत.
-
फोटोंवर तिने ‘महाकाल का बुलावा आ गया’ असे लिहले आहे. या खास ट्रिपचे फोटो शेअर करताना श्रेयाने एक भावनिक आणि सुंदर कॅप्शनदेखील दिली आहे.
-
तिने पोस्ट शेअर करत लिहिले आहे, “Childhood besties …..Our first trip together ever , & look, destiny brought us straight to where we were always meant to be ……..at the feet of Mahakal. Years of memories behind us, and a lifetime of them ahead of us. Jai Shri Mahakal Just the beginning.”
-
बालपणीच्या मैत्रिणीसोबतची ही पहिलीच ट्रिप थेट महाकालच्या चरणी घडून आल्याने श्रेयाने आनंद व्यक्त केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
काटा किर्रर्रर्र नाचलीस गं… ‘लिंबोणीचं लिंबू’ गाण्यावर तरूणीचा मनमोहक डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक