-
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’मध्ये अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर ‘इशिता’ ही भूमिका साकारत असून ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
-
नुकतेच मृण्मयीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही नवीन आणि खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये ती एका पारंपरिक तरीही मॉडर्न अशा खूपच सुंदर आणि आकर्षक अवतारात पाहायला मिळत आहे.
-
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाचा खणाचा स्लीव्हलेस कुर्ता घातला असून तो अतिशय शोभून दिसत आहे.
-
तिच्या दागिन्यांबद्दल बोलायचे झाले तर तिने नाकात पारंपरिक आणि सुबक मोत्याची नथ परिधान केली आहे.
-
तिने कानात आणि दंडावर अतिशय सुंदर डिझाईनचे सुवर्णरंगी दागिने (बाजूबंद) घातले आहेत, जे तिच्या लूकला उठाव देत आहेत.
-
मृण्मयीचा हा साधा, नेटका आणि पारंपरिक लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला असून फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मृण्मयी गोंधळेकर /इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”