-
अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालन करत असलेला ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सध्या प्रत्येक महाराष्ट्राच्या घरात मोठ्या उत्साहाने पाहिला जात आहे.
-
या लोकप्रिय कार्यक्रमात महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात आणि प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघ ही विशेष अतिथी म्हणून हजेरी लावणार आहे.
-
या खास भागासाठी शर्वरी वाघने अत्यंत आकर्षक आणि पारंपरिक-आधुनिक असा एक विशेष लूक परिधान केला आहे. तिने या खास लूकचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये शर्वरीने तिच्या आईची जुनी आणि अत्यंत मौल्यवान गुलाबी रंगाची पटोला साडी एका नव्या मॉडर्न ट्विस्टसह नेसलेली दिसत आहे.
-
हे सुंदर फोटो पोस्ट करत तिने तिच्या आईसाठी आणि या साडीसाठी एक अत्यंत भावूक कॅप्शन लिहिले आहे.
-
तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “जेव्हा माझ्या आईने पहिल्यांदा #JhumkaPatola पाहिले, तेव्हा तिच्या डोळ्यांतील प्रेम आणि अभिमान मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या आईने आशीर्वाद म्हणून तिची ही सुंदर गुलाबी पटोला साडी मला दिली, जी तिने अनेक वर्षे जपली होती आणि ज्यात तिच्या अनेक आठवणी आहेत.”
-
तिने पुढे लिहिले, “तिच्यासाठी इतकी मौल्यवान असलेली गोष्ट नव्याने परिधान करणे हा एक खास अनुभव होता, तिच्या साडीत मला तिचे प्रेम आणि आशीर्वाद वेढलेले असल्याचा भास होतो — आईच्या पदरातून माझ्या प्रवासाला आशीर्वाद!”
-
(सर्व फोटो सौजन्य: शर्वरी वाघ/इन्स्टाग्राम)
पुन्हा जंतर मंतर! अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचा ७ नोव्हेंबरला SIR विरोधात एल्गार; दिल्लीतील अटकेनंतर पहिलंच मोठं आंदोलन