-
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘ईठा’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
आज ३० ऑक्टोबर रोजी ‘ईठा’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
श्रद्धा कपूरने या फोटोंमध्ये सुरेख नऊवारी साडी नेसून अस्सल मराठमोळा पारंपरिक लूक केला आहे. तिने परिधान केलेल्या जांभळ्या आणि गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
या लूकसाठी तिने गळ्यात नाजूक ठुशी, नाकात पारंपरिक नथ आणि हातात हिरव्या-जांभळ्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
केसात माळलेला पांढऱ्या फुलांचा गजरा आणि कपाळावरील छोटी टिकली तिच्या मराठमोळ्या रूपाला पूर्णत्व देत आहे.
-
एका फोटोमध्ये श्रद्धाने हातात घुंगरू धरून अत्यंत आकर्षक आणि खास पोज दिली आहे.
-
हे सुंदर फोटो शेअर करताना तिने ‘Aaj trailer nahi aa raha hai, Eetha aa rahi hai Eetha’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
श्रद्धाचा हा नऊवारी साडीतील मराठमोळा अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रद्धा कपूर/इन्स्टाग्राम)
Video: ‘भारत समिट’मधील परदेशी पाहुण्यांच्या अनुपस्थितीबद्दल राहुल गांधींनी मागितली माफी; परराष्ट्र मंत्रालयाचेही प्रत्युत्तर