-
बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने यंदा अमेरिकेत अतिशय उत्साहात करवा चौथचा सण साजरा केला आहे.
-
प्रियांकाने या खास प्रसंगी लाल रंगाचा सुंदर पारंपरिक पोशाख परिधान केला होता, ज्यामध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते.
-
या सोहळ्यात प्रियांका आणि निक यांची लेक मालती मेरी हिनेही प्रियांकासारखाच लाल रंगाचा पारंपरिक ड्रेस घातला होता.
-
प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीबरोबरचे कौटुंबिक क्षण पाहायला मिळत आहेत.
-
प्रियांकाने आपल्या लहानग्या लेकीबरोबर घेतलेला एक गोड आणि सुंदर सेल्फी चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
परदेशात राहूनही भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या प्रियांकाचे चाहते सोशल मीडियावर भरभरून कौतुक करत आहेत.
-
प्रियांकाने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चाहत्यांनी या सुंदर जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रियांका चोप्रा/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव