-
बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता कपूर यांच्या मुंबईतील निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही करवा चौथचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
-
या पारंपरिक सोहळ्याला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, मीरा राजपूत, अंशुला कपूर आणि महीप कपूर यांनी आवर्जून हजेरी लावली होती.
-
यंदाच्या या विशेष सोहळ्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची खास उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
-
अनिल कपूर यांच्या घरातील या पारंपरिक पूजेसाठी उपस्थित सर्वच महिलांनी अत्यंत आकर्षक आणि पारंपरिक पोशाख परिधान केला होता.
-
सुनीता कपूर यांनी या संपूर्ण उत्सवाचे आणि सर्व मैत्रिणींबरोबरच्या आनंदी क्षणांचे काही खास फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो समोर येताच ते चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
-
दरवर्षीप्रमाणे यंदाही कपूर कुटुंबाच्या या करवा चौथ सोहळ्याने बॉलीवूड वर्तुळातील स्नेहाचे एक सुंदर दृश्य दाखवून दिले.
-
(सर्व फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
हृदयरोगतज्ज्ञ शिरीष हिरेमठ यांचे निधन; हृदयरोग उपचार क्षेत्रातील दिग्गज हरपला