-
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय व ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसे हिने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत.
-
आपल्या अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या नेहाचा हा नवा ट्रेडिशनल अवतार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
-
या फोटोंमध्ये नेहाने अतिशय सुंदर सिल्क साडी नेसली आहे, ज्यावर सुरेख काठ आणि नक्षीकाम पाहायला मिळत आहे.
-
साडीवर मॅचिंग डीप-नेक स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान करून नेहाने या पारंपरिक लूकला एक मॉडर्न आणि ग्लॅमरस टच दिला आहे.
-
नेहाची हेअरस्टाईल अतिशय सोबर आणि एलिगंट असून तिने केस हलके वळवून मागे नेट बांधले आहेत आणि पुढून मोकळ्या लटा ठेवल्या आहेत.
-
फोटोंमध्ये नेहाच्या चेहऱ्यावरील गोड हास्य आणि तिच्या खास अदा चाहत्यांना भुरळ पाडत आहेत.
-
सोशल मीडियावर तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्या या लूकवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:नेहा पेंडसे/ इन्स्टाग्राम)
पिवळा की काळा मनुका? तुमच्या आरोग्यासाठी कोणते मनुके फायदेशीर?