-
मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय आणि अभ्यासू अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने नुकताच तिचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा केला.
-
तिने आपल्या वाढदिवसाचे सुंदर आणि आनंददायी फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान तिने मित्र-परिवारासोबत एकत्र येऊन आनंद साजरा केला.
-
या विशेष प्रसंगी केक कापतानाचा एक आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आला आहे. तिच्या या वाढदिवसाच्या पार्टीला अनेक जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
-
शिवानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडून आणि सहकाऱ्यांकडून खूप लाइक्स मिळाले आहेत.
-
चाहत्यांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्स करून तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
तिने या पोस्टला ‘Birthday 2026! Thank you all for wishing me, celebrating with me, sending me love from afar! Couldn’t have asked for more!’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:शिवानी रांगोळे/ इन्स्टाग्राम)
तुम्हाला शौचासाठी किती वेळ लागतो? मलविसर्जनाच्या या एका सवयीवरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी!