-
Karwa Chauth 2026: बॉलिवूडच्या परंपरेनुसार, यंदाही करवा चौथची मुख्य पूजा अभिनेते अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या घरी आयोजित करण्यात आली होती.
-
शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) या पूजेला हजेरी लावत इतर बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
-
करवा चौथसाठी शिल्पाने अत्यंत सुंदर अशा ऑम्ब्रे पिंक साडीची निवड केली होती, ज्यावर आकर्षक गोल्डन डिझाईन आणि लाल रंगाची बॉर्डर होती.
-
या साडीवर शिल्पाने डार्क हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला होता.
-
शिल्पाने गळ्यात हिरव्या खड्यांचा भरजरी चोकर नेकलेस, मॅचिंग कानातले आणि लाल-पांढऱ्या-सोनेरी बांगड्या घालून आपला लूक परिपूर्ण केला होता.
-
तसेच हलकी गुलाबी लिपस्टिक, लाल बिंदी आणि मोकळे सोडलेले केस शिल्पाच्या या लूकला अधिक खुलवत होते.
-
संपूर्ण हातावर पारंपरिक मेहंदी न काढता शिल्पाने हाताच्या पाठीमागे एक मॉडर्न डिझाईन काढली होती आणि त्याला चमकीदार राइनस्टोन स्टिकर्स लावून एक हटके लूक दिला होता.
-
करवा चौथच्या पूजेदरम्यान शिल्पा ‘पल्लो लटके’ या गाण्यावर मनापासून डान्स करतानाही दिसली.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
“पाच हजार घेतलेत ना, गरज नसेल तर परत करा..”, गिरीश महाजनांचा शेतकऱ्यांना सल्ला