-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा सावंतचा (Pooja Sawant) ‘लग्न आणि बरंच काही’ (Lagna Aani Barach Kahi Movie) हा नवा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
-
स्त्रियांच्या जीवनातील सूक्ष्म भावना, अनुभव, स्वप्ने आणि संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
-
लग्नानंतरचे आयुष्य मुलीसाठी केवळ नव्या जबाबदाऱ्यांचे दालन उघडत नाही, तर तो तिच्या जीवनप्रवासातील एक नवा अध्याय, नवी वाटचाल आणि नात्यांच्या नव्या ओळखींचा आरंभ असतो. हा संपूर्ण प्रवास ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
-
या चित्रपटात पूजाने ‘पल्लवी’ ही मुख्य भूमिका साकारून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पूजाने साडीत एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून, त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पूजाने परिधान केलेली गडद निळ्या रंगाची टिशू सिल्क साडी आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
या लूकला परिपूर्ण करण्यासाठी पूजाने हलका मेकअप, आकर्षक कानातले आणि सुरेख बांगड्यांचा साज केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
मोदींच्या ‘एक्स’वरील पोस्टमुळे नागपूरचे वंजारी पोहोचले राष्ट्रीय पातळीवर