-
लोकप्रिय अभिनेत्री गौरी इंगवलेची (Gauri Ingawale) मुख्य भूमिका असलेला ‘दशमी’ (Dashmi Movie) हा मराठी सस्पेन्स-क्राईम थ्रिलर चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे.
-
अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या स्त्रीशक्तीची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश भोसले यांनी केले आहे.
-
‘वाईटावर चांगल्याचा विजय’ ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या या चित्रपटात गौरीबरोबरच मकरंद अनासपुरे, महेश मांजरेकर, रवि प्रकाश, देवेंद्र गायकवाड आणि शाम माशाळकर या दिग्गजांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
गौरीने नुकतेच या चित्रपटाच्या मुंबईतील प्रीमियर सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या प्रीमियरसाठी गौरीने परिधान केलेला काळ्या रंगाचा स्कर्ट आणि ब्रोकेड टॉपचा हटके लूक सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
‘दशमी’ हा चित्रपट केवळ रहस्य आणि थराराचा खेळ नसून, अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा देणारा एक प्रभावी विचार आहे.
-
भव्य दृश्यरचना, दर्जेदार तांत्रिक बाजू आणि मोठ्या पडद्याला साजेसे सादरीकरण ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी इंगवले/इन्स्टाग्राम)
“मला वाईट वाटलं होतं, पण…”; अभिजीत दिपकेंची पंजाबी गायक दिलजीत दोसांझबद्दलची पोस्ट चर्चेत