-
Zee Marathi Awards 2026: ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’चा दिमाखदार सोहळा प्रेक्षकांना आज आणि उद्या, म्हणजेच ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
-
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या पुरस्कार सोहळ्याची कलाकारांबरोबरच प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
मालिकांमधील आपल्या उत्तम भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे कलाकार यावेळी ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ मध्ये एका अनोख्या अंदाजात पाहायला मिळणार आहेत.
-
या सोहळ्यात अभिनेत्री दिव्या पुगावकरने (Divya Pugaonkar) हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी दिव्याने गुलाबी फुलांची नक्षी असलेला काळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता.
-
या फोटोंना दिव्याने “A Little Pink, A Little Magic…” असे कॅप्शन दिले आहे.
-
दिव्या सध्या झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) या मालिकेत काम करत असून, त्यात ती ‘जान्हवी’ ही भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिव्या पुगावकर/इन्स्टाग्राम)
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एकत्र भाऊबीज, दिवाळीच्या शेवटच्या दिवशी ठाकरे कुटुंबीय एकत्र