-
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या थायलंडच्या बँकॉक शहरामध्ये फिरायला गेली होती.
-
शिवानीने तिच्या या परदेश दौऱ्याचे काही खास आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधले.
-
एका फोटोमध्ये ती बँकॉकच्या मेट्रो स्टेशनवर कॅज्युअल कपड्यांमध्ये आणि गॉगल लावून अतिशय स्टायलिश पोज देताना दिसत आहे.
-
दुसऱ्या फोटोत बँकॉक शहरातील उंच इमारती आणि थाई मंदिरांच्या पार्श्वभूमीवर ती तेथील सुंदर वातावरणाचा आनंद घेत आहे.
-
एका निसर्गरम्य बागेतील तलावाच्या पुलावर पांढरा टी-शर्ट आणि डेनिम स्कर्ट परिधान केलेला तिचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
-
फोटो शेअर करताना शिवानीने ‘just a girl, romanticising her old pictures and pretending she doesn’t miss her long hair every single time she opens her gallery.’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
शिवानी सुर्वेच्या या बँकॉक येथील फोटोंवर आणि तिच्या मिश्किल कॅप्शनवर सध्या तिच्या चाहत्यांकडून लाइक्सचा मोठा वर्षाव होतोय.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवानी सुर्वे/ इन्स्टाग्राम)
१६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरू होणार सुवर्णकाळ, पदरात पडणार पुण्याचं फळ