-
अभिनेत्री शिवानी मुंढेकर ही मराठी टेलिव्हिजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय व लाडकी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
‘मुरांबा’ मालिकेतील तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आणि ती घराघरात पोहोचली.
-
आता शिवानी एका नव्या रूपात आणि रंजक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
-
‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘इच्छाधारी नागीण’ ही नवीन आणि बहुचर्चित मालिका सुरू होत आहे.
-
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये शिवानी मुंढेकर या मालिकेत मुख्य नायिकेची मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत आहे.
-
तिच्याबरोबर या मालिकेत अभिनेता अजिंक्य ननावरे हादेखील मुख्य भूमिकेत असून, दोघांची जोडी स्क्रीनवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
-
मालिकेच्या या नव्या प्रवासादरम्यान शिवानीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर निसर्गाच्या कुशीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
शिवानीचा हा निवांत, निसर्गप्रेमी आणि फ्रेश अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून, तिच्या या नवीन मालिकेसाठी सर्व जण तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य:शिवानी मुंढेकर/ इन्स्टाग्राम)
Zee Marathi Awards : आदर्श नवरा समर! तेजश्री प्रधानला मिळाले ‘हे’ तीन पुरस्कार, Zee 5 ची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली…