-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व अभ्यासू अभिनेता ललित प्रभाकर नेहमीच आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतो.
-
त्याने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
अविनाश अरुण यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात ललित प्रभाकरने मुख्य आरोपी अजमल कसाबची अत्यंत आव्हानात्मक आणि गंभीर भूमिका साकारली आहे.
-
त्याच्या या दमदार आणि वेगळ्या भूमिकेचे प्रेक्षक, तसेच चित्रपट समीक्षकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे.
-
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ललितने मुंबईतील ऐतिहासिक ताज हॉटेलमध्ये एक विशेष फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये ललित पांढऱ्या रंगाच्या पारंपरिक कुर्त्यामध्ये अत्यंत देखणा, शांत आणि राजस रूपात दिसत आहे.
-
ताज हॉटेलच्या भव्य आणि ऐतिहासिक वास्तूच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य:ललित प्रभाकर/ इन्स्टाग्राम)
शरद पवार आमच्यासोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुप्रिया सुळे यांना संधी मिळू शकते – रामदास आठवले