-
‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय मंचावर नुकतीच महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील हिने हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि होस्टिंग बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षित करत आहे. या खास भागात गौतमी पाटील आणि माधुरी दीक्षित या दोन लोकप्रिय अभिनेत्री एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
-
सेटवरील या खास क्षणांचे सुंदर फोटो गौतमी पाटील हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये गौतमीने निळ्या रंगाची पारंपरिक पैठणी साडी आणि दागिने परिधान केले असून माधुरी दीक्षित पिवळ्या आणि लाल रंगाच्या आकर्षक साडीत दिसत आहे.
-
एका फोटोमध्ये गौतमी पाटील अतिशय आदराने माधुरी दीक्षित यांच्या पाया पडून आशीर्वाद घेताना दिसत आहे.
-
गौतमीने फोटो शेअर करत या पोस्टला “काही भेटी या फक्त आठवणी नसतात, तर आयुष्यभरासाठी प्रेरणा देऊन जातात! एका बाजूला अभिनय आणि सौंदर्याची जादू, तर दुसऱ्या बाजूला स्वप्नांच्या प्रवासातील एक सुंदर क्षण… बॉलीवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित मॅम यांच्यासोबतचा हा अविस्मरणीय क्षण!ने या फोटोंना एक अतिशय भावूक आणि सुंदर कॅप्शन दिले आहे.” अशी कॅप्शन दिली आहे.
-
हे सुंदर आणि अविस्मरणीय फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांना मोठी पसंती मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:गौतमी पाटील/ इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव