-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अक्षया नाईकचा (Akshaya Naik) ‘लग्न आणि बरंच काही’ (Lagna Aani Barach Kahi Movie) हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
-
अक्षयाने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या सोहळ्यासाठी अक्षयाने तिच्या आईच्या साडीपासून तयार केलेला विशेष पोषाख परिधान केला होता.
-
अक्षयाने आईच्या हिरव्या रंगाच्या साडीपासून बनवलेला सुंदर परकर-पोलका आणि त्यावर लाल रंगाची ओढणी असा लूक केला होता.
-
या पारंपरिक लूकसाठी अक्षयाने गळ्यात ठुशी, कानातले आणि बांगड्या असा अस्सल मराठमोळा साज शृंगार केला होता.
-
अक्षयाच्या या फोटोंवर अभिनेत्री योगिता चव्हाणने “Sundariiiii” तर प्रतीक्षा मुणगेकरने “Goaduli” अशा कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
अक्षयाचा ‘लग्न आणि बरंच काही’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया नाईक/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS