-
‘धुरंधर’ चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सारा अर्जुनने आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूडमध्ये दिमाखदार पदार्पण केले आहे.
-
पहिल्याच चित्रपटातील तिचे उत्कृष्ट काम आणि अभिनयामुळे सध्या रसिक प्रेक्षक आणि चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
आपल्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकातून वेळ काढत सारा अर्जुन सध्या मालदीवच्या नयनरम्य भूमीवर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे.
-
समुद्रकिनाऱ्यांचे निसर्गसौंदर्य आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी तिने मालदीवच्या सुंदर पर्यटन स्थळांची निवड केली आहे.
-
मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरताना आणि तिथल्या निसर्गरम्य वातावरणात रमतानाचे तिचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये हातात ड्रिंक घेऊन सोफ्यावर बसून रिलॅक्स मूडमध्ये हसताना दिसत आहे.
-
एका फोटोमध्ये ती बीचवर खुर्चीवर बसून निसर्गाच्या सौंदर्यात हरवून गेलेली आणि विचारमग्न झालेली दिसते.
-
मालदीवच्या या खास ट्रिपचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने ‘Some places just make a trip that much more special’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:सारा अर्जुन/ इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”