-
Zee Marathi Awards 2026: झी मराठी अवॉर्ड्स २०२६ हा मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
-
या सोहळ्यात ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील अभिनेत्री मिनाक्षी राठोडने (Meenakshi Rathod) आपल्या खास आणि हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
या खास सोहळ्यासाठी मिनाक्षीने लाल रंगाची प्लेन साडी एका वेगळ्या व स्टायलिश पद्धतीने परिधान केली होती.
-
लाल साडीच्या या लूकवर मिनाक्षीने मोठा हार, मॅचिंग कानातले आणि अंगठी असा आकर्षक दागिन्यांचा साज केला होता.
-
या लूकला पूर्ण करण्यासाठी मिनाक्षीने सुंदर मेकअप केला असून, केसांच्या हेअरस्टाईलमध्ये माळलेली पांढरी फुले तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहेत.
-
हे फोटो शेअर करत मिनाक्षीने “काळ्या आणि पांढऱ्या जगात, एक चमकणारा लाल रंग व्हा” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
मिनाक्षी सध्या झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) या मालिकेत ‘वीणा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिनाक्षी राठोड/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव