-
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने आणि अद्भूत फिटनेसने प्रेक्षकांची मने जिंकून घेते.
-
वय वाढले तरी श्वेताचे सौंदर्य अधिकच खुलत चालले असून, ती आजही अनेक तरुण अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत मात देते.
-
अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही नवीन आणि आकर्षक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये श्वेताचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने परिधान केलेला मरून रंगाचा फुल-स्लीव्ह बॉडीकॉन ड्रेस तिच्यावर अत्यंत शोभून दिसत आहे.
-
या ड्रेसवर मध्यभागी दिलेली गोल डिझाईन आणि नॉट (Knot) स्टाईल तिच्या या लूकला अधिकच स्टायलिश बनवते.
-
मोकळे सोडलेले केस आणि मॅचिंग इअररिंग्समुळे तिचा हा ग्लॅमरस लूक अधिकच उठून दिसत आहे.
-
श्वेताच्या या फोटोवर तिचे चाहते कमेंट्सचा वर्षाव करीत असून, तिच्या या लूकचे भरभरून कौतुक करीत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य:श्वेता तिवारी/ इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव