-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) यंदाच्या हॅलोवीननिमित्त (Halloween) तिची दिवंगत आई आणि हिंदी सिनेमाची सुपरस्टार श्रीदेवी (Sridevi) यांना एक खास श्रद्धांजली वाहिली आहे.
-
१९८६ मधील गाजलेल्या ‘नगिना’ (Nagina) चित्रपटातील श्रीदेवी यांच्या प्रसिद्ध ‘इच्छाधारी नागिन’ लूकची जान्हवीने हुबेहूब पुनरावृत्ती केली आहे.
-
जान्हवीने ‘नगिना’ चित्रपटातील श्रीदेवी यांच्या लूकप्रमाणेच पांढऱ्या व गुलाबी रंगाचा पोशाख, मॅचिंग दागिने, मेकअप आणि केशरचना केली आहे.
-
या फोटोशूटमध्ये जान्हवीचा मित्र ओरीने (Orry) ‘नगिना’ चित्रपटातील दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांची भूमिका साकारत तिची साथ दिली.
-
जान्हवी आणि ओरीने या चित्रपटाचे पोस्टर आणि काही प्रसिद्ध सीन्स रीक्रिएट केले आहेत.
-
फोटो शेअर करत जान्हवीने लिहिले, “हॅलोवीन म्हणजे आपल्या आवडीचे पात्र साकारणे किंवा कोणाला तरी ट्रिब्यूट देणे. मम्मी (श्रीदेवी), ऋषी अंकल आणि अमरीश पुरी सर यांच्यापेक्षा अधिक आयकॉनिक कोण असू शकतं!”
-
जान्हवीच्या या हॅलोवीन ट्रिब्यूटवर तिची बहीण खुशी कपूर, करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांनी कमेंट्स करत तिचे भरभरून कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव