-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) या कौटुंबिक मालिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) या मालिकेत ‘जान्हवी’ची भूमिका साकारत असून, तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
कुटुंबातील मुलांचे प्रश्न, घरगुती अडचणी, नात्यांमधील ताणतणाव आणि अशा परिस्थितीत ‘लक्ष्मी’ आपल्या बुद्धिमत्ता व नैतिक मूल्यांच्या जोरावर कुटुंबाचे रक्षण कसे करते, हे या मालिकेत अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आले आहे.
-
वास्तववादी कथानक आणि कलाकारांचा सशक्त अभिनय यांमुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
दिव्याने नुकतेच एका खास साडी लूकमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दिव्याने मोराची नक्षी असलेला हिरव्या रंगाचा पारंपरिक पैठणी परिधान केली आहे.
-
या पैठणीवर दिव्याने गळ्यात पारंपरिक ठुशी, नाकात नथ, मंगळसूत्र आणि हातात हिरव्या बांगड्या असा परिपूर्ण साज केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिव्या पुगावकर/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव