-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री अनघा अतुल भगरे हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
-
या मालिकेत ‘आर्या’ ही भूमिका साकारून ती घराघरांत पोहोचली असून तिच्या पात्राला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
-
अभिनयासोबतच अनघा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून ती सतत तिचे नवीन फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अनघाने गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंटेड स्लीवलेस टॉप आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली आहे.
-
तिने या लूकसोबत पांढऱ्या रंगाचे कॅज्युअल स्नीकर्स मॅच केले असून तिचा हा व्हेकेशन लूक अत्यंत स्टायलिश दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये ती एका बोटीवर निवांत क्षणांचा आनंद घेत समुद्राच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मनमोहक आणि आकर्षक अंदाजात पाहायला मिळत आहे.
-
अनघाच्या या क्युट आणि वेस्टर्न लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:अनघा भगरे/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS