-
झी मराठी वाहिनीवर २८ सप्टेंबरपासून सुरू झालेली ‘धाकट्या सुनबाई’ (Dhaktya Sunbai TV Serial) ही नवी मालिका हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
नाती, आपलेपणा, प्रेम आणि माणुसकीची सुंदर गुंफण असणारी ही मालिका प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करत आहे.
-
दोन भिन्न कुटुंबे, त्यांचे विचार आणि नात्यांमधील गुंतागुंत या मालिकेतून पाहायला मिळत आहे. आपल्या माणसांची साथ आणि नात्यांमधील विश्वास आयुष्याला कसा अर्थ देतो, याची रंजक गोष्ट ‘राधिका’ आणि ‘वेदांत’ यांच्या माध्यमातून उलगडत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री मुग्धा कर्णिक (Mugdha Karnik) ‘दमयंती’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
-
नुकतीच मुग्धाने ‘झी मराठी अवॉर्ड्स सोहळा २०२६’ (Zee Marathi Awards 2026) मध्ये खास हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी मुग्धाने गुलाबी काठ असलेली सुंदर केशरी रंगाची साडी परिधान केली होती.
-
या खास लूकचे फोटो शेअर करत तिने “साडी चिरंतन आहे! साडी प्रेम आहे!” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा कर्णिक/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS