-
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर सध्या तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ या प्रसिद्ध मालिकेत ती ‘ऐश्वर्या’ ही अत्यंत महत्त्वाची व रंजक भूमिका साकारताना दिसत आहे.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनयशैलीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्रतीक्षाने नुकतेच तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या नवीन फोटोशूटमध्ये अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर हिचा पारंपरिक आणि अत्यंत देखणा अंदाज पाहायला मिळत आहे.
-
फोटोंमध्ये तिने पिवळ्या (मस्टर्ड गोल्ड) रंगाची सुंदर सिल्क साडी नेसली असून त्याला गडद लाल रंगाची नक्षीदार काठ आहे.
-
नाकात नाजूक पारंपरिक नथ, कानात शोभून दिसणारे झुमके आणि हातात सोनेरी बांगड्यांनी तिचा हा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
-
प्रतीक्षाचा मराठमोळा अंदाज सध्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत असून फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य:प्रतीक्षा मुणगेकर/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव