-
झी मराठी वाहिनीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ (Krushnaichya Leki) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून, या मालिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर (Anushka Pimputkar) ‘जिगिशा’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
अनुष्काने नुकतीच ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ (Zee Marathi Awards 2026) या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्याला ‘झी मराठी’वरील विविध मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
-
या सोहळ्यात प्रेक्षकांना सर्व नायिकांचे, लोकप्रिय जोड्यांचे आणि खलनायकांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळाले.
-
‘झी मराठी अवॉर्ड्स’च्या रेड कार्पेटवर अनुष्काने परिधान केलेल्या जांभळ्या रंगाच्या डिझायनर साडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
या सुंदर जांभळ्या साडीवर अनुष्काने परिधान केलेला नाजूक हिऱ्यांचा हार तिच्या लूकला अधिकच आकर्षक बनवत होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुष्का पिंपुटकर/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS