-
अभिनेत्री करीना कपूरच्या प्रसिद्ध व लोकप्रिय टॉक शो ‘व्हॉट वूमन वॉन्ट’च्या (What Women Want) आगामी एपिसोडमध्ये करीना कपूरचा एक्स-बॉयफ्रेंड शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतने विशेष हजेरी लावली.
-
शोमधील या खास सहभागादरम्यान मीराने केलेल्या स्टायलिश लूकचे काही फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
मीराने या फोटोशूटसाठी ऑफ-व्हाईट रंगाचा ऑफ-शोल्डर एम्ब्रॉयडरी टॉप परिधान केला आहे, ज्यावर नक्षीकाम आणि थ्रेड वर्क केलेले दिसत आहे.
-
या सुंदर टॉपसोबत मीराने लेदरची ब्लॅक रंगाची बॉटम पँट परिधान करून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
तिने आपल्या लूकला साजेसे अशी सोन्याची कर्णफुले, हातात घड्याळ, अंगठी आणि मोकळे सोडलेले केस ठेवून अतिशय एलिगंट लूक तयार केला आहे.
-
हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना मीराने ‘What women want, is to be themselves. Thanks @kareenakapoorkhan for having me and for being the woman you are’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
मीराच्या या पोस्टवर करीना कपूर खाननेदेखील तत्काळ प्रतिक्रिया देत ‘So happy you came gorgeous’ अशी कमेंट केली आहे.
-
करीना आणि मीरा यांच्यातील हे बॉण्डिंग आणि संवाद सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (सर्व फोटो सौजन्य: मीरा राजपूत/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव