-
Halloween 2026: सुपरमॉडेल हायडी क्लमने (Heidi Klum) या वर्षीच्या हॅलोवीनसाठी अत्यंत अनोखा आणि थक्क करणारा लूक साकारला आहे.
-
हायडीने स्वतःला एका ‘रक्ताळलेल्या आणि शरीरापासून वेगळ्या झालेल्या अवाढव्य हाताच्या’ रूपात रूपांतरित केले.
-
या कॉस्च्युममध्ये हाताच्या नसा, हाडे आणि स्नायू अगदी स्पष्ट दिसत होते. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिला जवळपास ५ ते ६ तास लागले.
-
हाताच्या लांब लाल नखांसोबतच, तिच्या बोटांमध्ये ती रोज वापरत असलेल्या अंगठ्यांची प्रतिकृती (ज्यात तिच्या पतीच्या नावाची अंगठी आणि टॅटूचा समावेश होता) पाहायला मिळाली.
-
हाताच्या तळहाताच्या मध्यभागातून फक्त हायडीचा चेहरा (डोळे आणि तोंड) दिसत होता.
-
न्यूयॉर्क शहरात आयोजित २५ व्या वार्षिक हॅलोवीन पार्टीत तिने लाल रंगाचे धोक्याचे इशारे लिहिलेल्या ट्रकमधून नाट्यमय एन्ट्री केली.
-
हायडीबरोबर पिवळ्या रंगाचा ‘हॅझमॅट सूट’ घातलेली मंडळी होती.
-
हायडीच्या मते, हा कॉस्च्युम अत्यंत जड असल्यामुळे तो परिधान करून वावरणे हे तिच्यासाठी सर्वात कठीण काम होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : हायडी क्लम/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”