-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अक्षया गुरवने (Akshaya Gurav) आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
सध्या अक्षयाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये अक्षयाने गडद तपकिरी रंगाची सुंदर नारायणपेठी साडी परिधान केली आहे.
-
नारायणपेठी साडीची निर्मिती तेलंगणा राज्यातील महबूबनगर जिल्ह्यातील ‘नारायणपेठ’ या गावात केली जाते.
-
अक्षयाने या नारायणपेठ साडीवर पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
अक्षयाने हा खास लूक तिच्या ‘मृत्यूचक्र’ या नवीन चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यासाठी केला होता.
-
अक्षयाला झी युवा वाहिनीवरील गाजलेल्या ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेतून खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया गुरव/इन्स्टाग्राम)
माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितले, तुमच्या पोटाच्या आरोग्याचे शत्रू आहेत ‘हे’ ४ पदार्थ! लगेच बिघडवतात पचनक्रिया; आजपासूनच खाणं सोडा, अन्यथा…