-
आसामची प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी दास (Surabhi Das) लवकरच नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ (Ramayana Movie) या भव्य चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
या चित्रपटात सुरभी ‘श्रुतकीर्ती’ ही भूमिका साकारत आहे. पौराणिक कथांनुसार श्रुतकीर्ती ही राजा जनकाचे भाऊ कुशध्वज यांची मुलगी आणि देवी सीतेची सर्वात लहान बहीण आहे.
-
श्रुतकीर्तीचा विवाह प्रभू श्रीरामांचे सर्वात लहान भाऊ शत्रुघ्न यांच्याशी झाला होता.
-
सुरभीने नुकतीच आसाममधील गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराला (Kamakhya Devi Temple) भेट देऊन दर्शन घेतले.
-
बॉलिवूडमधील या मोठ्या प्रोजेक्टची सुरुवात करण्यापूर्वी सुरभीने आपल्या मूळ गावी (आसाम) जाऊन कामाख्या देवीचे आशीर्वाद घेतले.
-
कामाख्या देवीच्या परिसरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने लिहिले, “कोणत्याही नवीन प्रवासाची सुरुवात करताना कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत महत्त्वाचे असते. देवीचे हे आशीर्वाद मी माझ्यासोबत घेऊन जात आहे.”
-
या चित्रपटात सुरभी दासबरोबर रणबीर कपूर (प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत) आणि साई पल्लवी (देवी सीतेच्या भूमिकेत) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरभी दास/इन्स्टाग्राम)
तुम्हाला शौचासाठी किती वेळ लागतो? मलविसर्जनाच्या या एका सवयीवरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी!