-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर ‘इशिता’ या भूमिकेद्वारे घराघरांत पोहोचली आहे.
-
आपल्या उत्तम अभिनयशैलीने आणि सोज्वळ सौंदर्याने मृण्मयीने अगदी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेली मृण्मयी नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
नुकतेच तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर सुंदर पारंपरिक फारशी सूटमधील काही मनमोहक फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने तपकिरी रंगाचा आणि सोनेरी बॉर्डर असलेला शॉर्ट कुर्ता तसेच लाल रंगाची सुंदर सलवार केली आहे.
-
या पोशाखावर तिने गळ्यात काहीही न घालता केवळ कानात शोभून दिसणारे सोनेरी झुमके आणि हातात नाजूक बांगड्या घातल्या आहेत.
-
मृण्मयीच्या या सोज्वळ आणि देखण्या लूकवर तिच्या चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा मोठा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:मृण्मयी गोंधळेकर/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS