-
‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी लाडकी मराठी अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे.
-
रसिकाने नुकतेच लाल रंगाच्या साडीत एक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
-
या लूकसाठी रसिकाने लाल रंगाच्या साडीवर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
मोकळे केस आणि हलक्या मेकअपसह रसिकाने हा लाल साडीतील लूक परिपूर्ण केला आहे.
-
झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Majhya Navaryachi Bayko) या मालिकेतील रसिकाची ‘शनाया’ ही भूमिका महाराष्ट्राच्या घराघरात तुफान गाजली.
-
रसिकाने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘गर्लफ्रेंड’, ‘बस स्टॉप’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
-
चित्रपटांव्यतिरिक्त रसिकाने ‘डाएट लग्न’ या व्यावसायिक नाटकात काम केले असून राज्य नाट्य स्पर्धांमधील अनेक नाटकांतही ती झळकली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका सुनील/इन्स्टाग्राम)
लग्नानंतरची पहिलीच दिवाळी? मग नवऱ्याला द्या पाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा; ‘या’ फ्री HD Images करा शेअर