-
झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ (Tarini TV Serial) या मालिकेने आपल्या दमदार कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ने अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालून न्यायासाठी ठामपणे लढा दिला आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) मुख्य भूमिकेत असून, तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
-
शिवानीने नुकतीच ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ (Zee Marathi Awards 2026) या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी शिवानीने खास ग्लॅमरस लूक करत हिरव्या रंगाचा सुंदर ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केला होता.
-
घर आणि कुटुंब सांभाळणारी डॅशिंग बॉस ‘तारिणी’ साकारणारी शिवानी ‘सर्वोत्कृष्ट नायिका’ या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
-
या सोहळ्यात एका धाडसी महिला ऑफिसरची गोष्ट सांगणाऱ्या ‘तारिणी’ या मालिकेने ‘सर्वोत्कृष्ट मालिका’ हा पुरस्कार पटकावला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला; म्हणाले, “मी डेमोक्रॅट्ससोबत काम करेन”; मध्यावधी निवडणुकीचे कल स्पष्ट!