-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) पती, अभिनेता हार्दिक जोशीसह (Hardeek Joshi) कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जाऊन श्री दर्शन घेतले.
-
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख आणि अत्यंत पवित्र शक्तिपीठ मानले जाते.
-
करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूरचे मुख्य आकर्षण आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेले हे मंदिर अत्यंत भव्य आणि आकर्षक आहे.
-
या मंदिरातील दर्शनावेळी अक्षयाने पांढऱ्या रंगाची, काळ्या काठाची सुंदर इरकल पैठणी साडी परिधान केली होती.
-
अक्षयाने निधी आणि माधुरी यांच्या साथीने ‘भरजरी’ (Bharjari) नावाचा स्वतःचा साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.
-
अक्षयाच्या ‘भरजरी’ या साडी ब्रँडचे कोल्हापुरात भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
-
अक्षया आणि हार्दिक २ डिसेंबर २०२२ रोजी विवाहबंधनात अडकले. सध्या ती झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS