-
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील एक अभ्यासू, गुणी आणि अत्यंत देखणी अभिनेत्री म्हणून शिवानी रांगोळे ओळखली जाते.
-
तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवानीने सोशल मीडियावर आपले काही नवीन आणि खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने सुंदर जांभळ्या रंगाची रेशमी साडी नेसली आहे, त्यावर सोनेरी काठ अतिशय खुलून दिसत आहे.
-
गळ्यात मोत्यांचा आणि सोन्याचा सुंदर हार, कानात झुमके आणि हातात सोन्याची बांगडी असा पारंपरिक दागदागिन्यांचा साज तिने परिधान केला आहे.
-
सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करत तिने ‘A bit of Diwali vibes before Diwali!’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
शिवानीचा हा सणासुदीचा पारंपरिक लूक तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडला असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS