-
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी लोकप्रिय अभिनेत्री गौतमी देशपांडे नेहमीच चर्चेत असते.
-
आपल्या सहजसुंदर अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते.
-
नुकतेच गौतमीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून तिचे काही नयनरम्य फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गौतमीचा पारंपरिक लूक पाहायला मिळत आहे. तिने नेसलेली लाल रंगाची प्रिंटेड साडी तिच्या या खास लूकला अत्यंत शोभून दिसत आहे.
-
कपाळावरील छोटी काळी टिकली, नाकात नाजूक नथ आणि चेहऱ्यावरचे सुंदर हास्य यामुळे तिचा लूक आणखीच लोभसवाणा वाटतो.
-
मोकळे सोडलेले केस आणि साधेपणा जपणारा मेकअप तिच्या साडीतील सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
गौतमीच्या या नव्या साडी लूकवर सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:गौतमी देशपांडे/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”