७ जानेवारी २०१५
- 1 / 7
मकर संक्रांत सणाची लगबग सुरू झाली असून मुंबईच्या बाजारपेठा रंगबिरंगी पतंगांनी सजल्या आहेत. (छाया- दीपक जोशी)
- 2 / 7
मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात पथनाट्य सादर करताना विद्यार्थी. (छाया- प्रशांत नाडकर)
- 3 / 7
ओरियन्टल कॉलेजच्या वतीने मुबंईत स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आदर्श नगर परिसरात विद्यार्थी आणि शिक्षकांनी हाती झाडू घेऊन साफसफाई केली. (छाया- अमित चक्रवर्ती)
- 4 / 7
वाहनचालकांच्या खिशाला आणखी कात्री लावण्यासाठी सुरू झालेल्या खारघर येथील टोलनाक्यामुळे पहिल्याच दिवशी सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. (छाया- नरेंद्र वास्कर)
- 5 / 7
मुंबईतील फोर्ट परिसरात बुधवारी शालेय विद्यार्थ्यांनी फलकांच्या माध्यमातून वाहतुकीविषयी नियम पाळण्याचा संदेश दिला. (छाया- अमेय बेर्डे)
- 6 / 7
मुंबईत होणाऱ्या स्वरांजली २०१५ या कार्यक्रमानिमित्त गायक शंकर महादेवन, प्रसिद्ध बासरीवादक रोनू मुझूमदार, संतुरवादक राहुल शर्मा आणि तबलावादक अदित्य कल्याणपुरकर एकत्र आले होते. (छाया- दिलीप कागडा)
- 7 / 7
मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ६ ते १२ जानेवारी दरम्यान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसेन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन केले. (छाया- अमित चक्रवर्ती)