-
कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्यावर गुरूवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद कर्नल संतोष महाडिक यांना पाच वर्षाचा मुलगा आणि भावाने मुखाग्नी दिला. 
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पोगरवाडीत शहीद संतोष महाडिक यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 
‘आपलं जगणं देशासाठी असेलच, पण मरणही देशासाठीच असेल’, असा निश्चय करूनच लष्करात दाखल झालेल्या कर्नल संतोष महाडिकच्या पार्थिवावर साताऱ्याजवळच्या पोगरवाडीत अंत्यसंस्कार होत असताना अवघ्या देशाने त्याच्या शौर्याला शिर झुकवून सलाम केला. -
-
-
-
-
-
राष्ट्रीय रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी संतोष महाडिक यांचं पार्थिव आरेदरे गावात आणले
-
-
यावेळी सातारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये कर्नल महाडिक यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले होते.
-
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”