
आगामी वर्षात तुम्ही देशाबाहेर पर्यटनाला जाण्याचा बेत आखत असाल तर आम्ही सुचविलेल्या या १० ठिकाणांचा विचार जरूर करू शकता. बोटसवाना, उरूग्वेपासून या काहीशा अपरिचित ठिकाणांपासून ते ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांची सफर तुमच्यासाठी नक्कीच आनंददायी अनुभव ठरू शकतो.
बोटसवाना- निसर्गाचे पुरेपूर देणे लाभलेल्या आणि पर्यटकांसाठी उत्तम सुविधा असणारे बोटसवाना तुमच्यासाठी एक उत्तम पर्यटनस्थळ ठरू शकते. पुढील वर्षी हा देश स्वातंत्र्याची ५० वर्षे पूर्ण करीत असल्यामुळे बोटसवानाला भेट देण्याचा अनुभव अधिकच चांगला ठरू शकतो. (छाया- वर्ल्डवाईड टूर सफारी. कॉम)
जपान- आधुनिकता आणि पारंपरिकता या दोघांचा मेळ असणारे पर्यटनस्थळ म्हणून जपानकडे पाहिले जाते. (छाया- त्सुनागु जपान.कॉम)
अमेरिका- भारतीयांसाठी अमेरिका हा देश नेहमीची औत्स्युकाचा आणि कुतूहलाचा विषय ठरत आलेला आहे. येथील अनेक गोष्टींनी भारतीय समाजमनावर भुरळ घातलेली दिसते. त्यामुळे यंदाच्या वर्षात अमेरिकेला भेट देऊन तुम्ही तुमची ट्रिप सार्थकी लावू शकता.
पलाऊ- अप्रतिम सागरी सौदर्यांने नटलेले पलाऊ हे ठिकाण प्रेमी युगुलांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
लाटव्हिया- गेल्या काही वर्षात पूर्व युरोप पर्यटनाच्यादृष्टीने प्रगत होत आहे. मात्र, तरीही लाटव्हियासारख्या पश्चिम युरोपमधील देशाला पर्यटनासाठी अजूनही तितकीच पसंती मिळत आहे. याठिकाणची प्राचीन संस्कृती आणि ठिकाणे पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे.
ऑस्ट्रेलिया- गेल्या काही वर्षात भारतातून ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. नैसर्गिक सौंर्दयाने नटलेले समुद्र किनारे, ग्रेट बॅरियर रीफ आणि खवय्येगिरीचे अनेक पर्याय या कारणांमुळे पर्यटकांकडून ऑस्ट्रेलियाला पसंती मिळत आहे. (छाया- युरोप एज्युकेशन सेंटर)
पोलंड- पोलंडमधील क्राको, व्रोकलॉ, जीडन्सक, स्नेझसिझिसिन, काटोवाईस ही शहरे कायमच पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आली आहेत. ( छाया- विकीपिडीया)
उरूग्वे- अमेरिकेचे स्वित्झर्लंड अशी उरूग्वेची ख्याती आहे. नाईटलाईफसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऊरूग्वेत आगामी वर्षात विक्रमी पर्यटन होण्याची शक्यता आहे. (छाया- ग्लोबल व्हिलेज वर्ल्ड)
ग्रीनलँड- आर्क्टिक प्रदेशातील हा प्रदेश बर्फाळ ठिकाणांचे आकर्षण पर्यटकांसाठी निश्चितच वेगळा अनुभव ठरू शकतो. (छाया- अॅकॅडमीया उरूग्वे)