22 November 2017

News Flash

हे आहेत हळदीचे फायदे

 • हळद ही भारतीय स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक आहे. हळद केवळ पदार्थाला रंग येण्यासाठीच नसते. तर त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंटस असतात. सुरुवातीला हळद केवळ डाय करण्यासाठी वापरली जायची मात्र त्याच्या इतर फायद्यांचा शोध कालांतराने लागला.

  हळद ही भारतीय स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक आहे. हळद केवळ पदार्थाला रंग येण्यासाठीच नसते. तर त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंटस असतात. सुरुवातीला हळद केवळ डाय करण्यासाठी वापरली जायची मात्र त्याच्या इतर फायद्यांचा शोध कालांतराने लागला.

 • हळदीचा त्वचा तजेलदार होण्यासाठीही उपयोग होतो. त्यामुळे तुमच्या त्वचेवर तारुण्याप्रमाणे उजळपणा येतो. याशिवाय जखमेवर लावण्यासाठीही हळदीचा विशेष उपयोग होतो.

  हळदीचा त्वचा तजेलदार होण्यासाठीही उपयोग होतो. त्यामुळे तुमच्या त्वचेवर तारुण्याप्रमाणे उजळपणा येतो. याशिवाय जखमेवर लावण्यासाठीही हळदीचा विशेष उपयोग होतो.

 • हळदीमधील घटकांमुळे विविध प्रकारच्या संसर्गांपासून तुमचे संरक्षण होते. मुख्यतः घशाला संसर्ग झाला असल्यास दूधात हळद घालून प्यायल्यास त्याचा फायदा होतो.

  हळदीमधील घटकांमुळे विविध प्रकारच्या संसर्गांपासून तुमचे संरक्षण होते. मुख्यतः घशाला संसर्ग झाला असल्यास दूधात हळद घालून प्यायल्यास त्याचा फायदा होतो.

 • हळद ही केवळ चेहऱ्यावरील पुरळ जाण्यासाठीच उपयुक्त नसते तर चेहऱ्याची आगही हळदीमुळे कमी होते.

  हळद ही केवळ चेहऱ्यावरील पुरळ जाण्यासाठीच उपयुक्त नसते तर चेहऱ्याची आगही हळदीमुळे कमी होते.

 • हळदीमुळे जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध होतो, त्यामुळे ती अँटिसेप्टीक म्हणूनही ओळखली जाते. हळदीमुळे जखम लवकर भरुन येण्यास मदत होते.

  हळदीमुळे जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध होतो, त्यामुळे ती अँटिसेप्टीक म्हणूनही ओळखली जाते. हळदीमुळे जखम लवकर भरुन येण्यास मदत होते.

 • १ चमचा हळद, १ चमचा मध दुधात एकत्र करावा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटे ठेवावे. कोरडे झाल्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवावा. त्वचा नितळ दिसण्यासाठी याचा फायदा होतो.

  १ चमचा हळद, १ चमचा मध दुधात एकत्र करावा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटे ठेवावे. कोरडे झाल्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवावा. त्वचा नितळ दिसण्यासाठी याचा फायदा होतो.

अन्य फोटो गॅलरी