लग्न ठरल्यानंतर प्रत्येक तरुण किंवा तरुणी त्यांच्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असतात. तर दुसरीकडे मात्र त्यांची मित्रमंडळी बॅचरल पार्टीची आतुरतेने वाट पाहत असतात. मग लग्नाच्या धामधुमीत या तरुणांची बॅचलर पार्टीसाठी जागा शोधण्यास सुरुवात होते. अनेक ठिकाणं शोधल्यानंतरही आपल्याला हवी तशी जागा मिळतेच असं नाही. त्यामुळे बऱ्याचदा या पार्टीतली मज्जा निघून जाते. परंतु जर तुमची पार्टी अविस्मरणीय करायची असेल तर या २७ ठिकाणी नक्कीच भेट द्या. १. लास वेगस – लास वेगस (Las Vegas, Nevada) हे अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील सर्वात मोठं शहरं म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये असंख्य कॅसिनो, जुगार अड्डे आणि मनोरंजनाची अनेक ठिकाणं आहेत. त्यामुळो हे शहर तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. बुलेव्हार्ड (द स्ट्रिप) या मार्गावर सर्वात मोठी हॉटेल्स व कॅसिनोज आहेत. २. बँकॉक , थायलँड- बँकॉक (Bangkok, Thailand) ही थायलंडची राजधानी असून येथील सर्वात मोठं शहर आहे. येथे मरीन पार्क हे पर्यटकांच्या आकर्षणाचं ठिकाणं आहे. मरीन पार्क येथे डॉल्फीनचे शो दाखविले जातात. तसंच सफारी वर्ल्ड हे येथील सर्वात मोठं पक्षीअभयारण्य आहे. ३. बाली, इंडोनेशिया – इंडोनेशिया हा देश तसा सांस्कृतिक वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. हा खरंतर अधिकृत मुस्लीम देश, पण बाली (Bali, Indonesia) हिंदूबहुल प्रांत आहे. निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची आवड असणाऱ्यांसाठी बाली हे सर्वात लाडके ठिकाण. जगभरातून पर्यटक येथे येत असतात. सर्व प्रकारच्या आधुनिक सोयी-सुविधांच्या सोबतीनेच निसर्गाचा पुरेपूर आनंद देणारे पर्यटन स्थळ म्हणून बालीचा लौकिक. त्यामुळे बॅचलर पार्टीसाठी ही परफेक्ट जागा आहे. ४. मियामी, फ्लोरिडा – मियामी (Miami, Florida) हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक प्रमुख शहर आहे. मनोरंजन, शिक्षण, कला,संगीत, संस्कृती या सगळ्यासाठी मियामी लोकप्रिय आहे. ५. बार्सिलोना, स्पेन – बार्सिलोना (Barcelona, Spain) ही स्पेनच्या कातालोनिया प्रांताची राजधानी व स्पेनमधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. तरुणाईला भूरळ घालेलं असं हे शहर असल्यामुळे तरुणाईची या ठिकाणाला जास्त पसंती आहे. ६. मॉन्ट्रियाल, कॅनडा – मॉन्ट्रियाल ( Montreal, Canada) हे कॅनडाच्या क्वेबेक प्रांतातील सर्वात मोठे शहर आहे. या शहरातील ५२.५ टक्के नागरिक फ्रेंच भाषिक असून हे पॅरिस खालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर आहे. ७. इबिझा, स्पेन – इबिझा (Ibiza, Spain) हे एक बेट असून त्याच्या चहूबाजूने पाण्याने त्याला घेरलं आहे. येथे असंख्य पर्यटक भेट देतात. ८. बुईनोस आयरेस, अर्जेंटिना – बुईनोस आयरेस (Buenos Aires, Argentina) हे अर्जेंटिनाची राजधानी असून येथील सर्वात मोठं शहर आहे. पार्टी करण्यासाठी येथे अनेक उत्तम ठिकाणं आहेत. त्यामुळे सध्या तरुणाई बुईनोस आयरेसकडे आकर्षित होताना दिसतात. ९. गोवा – भारतातील लोकप्रिय ठिकाण म्हणजे गोवा. अफाट पसरलेला समुद्र आणि येथील नाईट लाइफमुळे गोवा तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. तसंच गोवा ट्रीप कमी दिवसात आणि कमी खर्चात होते. १०. अॅमस्टरडॅम – अॅमस्टरडॅम (Amsterdam, Netherlands) ही नेदरलँड्स देशाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे. ११. न्यू ऑर्लिन्स, लुईसियाना – न्यू ऑर्लिन्स (New Orleans, Louisiana) हे अमेरिकेच्या लुईसियाना राज्यातील सर्वात मोठे शहर व अमेरिकेतील एक मोठे बंदर आहे. १२. रियो डी जानीरो – रियो डी जानीरो (Rio De Janeiro, Brazil) हे ब्राझील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १७६३ ते १९६० दरम्यान ही ब्राझीलची राजधानी होती. २०१६मध्ये रियो डी जानीरोमध्ये ऑलिंपिक खेळस्पर्धा झाल्या. तसेच हे एक उत्तम बंदर असून व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.या शहराला दक्षिण अटलांटिक महासागराचा समुद्रकिनारा लाभला आहे. १३. होनोलुलु, हवाई- होनोलुलु (Honolulu, Hawaii) हे अमेरिका देशातील हवाई राज्याच्या राजधानीचे शहर आहे. तसंच हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे जन्मस्थान आहे. या शहराचं नाव जरी ऐकल्यानंतर थोडं वेगळं वाटलं तरी या शहराला निसर्गाची देण लाभलेली आहे. १४. डेन्व्हर, कॉलोराडो – डेन्व्हर (Denver, Colorado) ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याची राजधानी आहे. तसंच येथील मोठे शहर आहे. डेन्व्हर शहर रॉकीझ पर्वतरांगेच्या पायथ्याशी साउथ प्लॅट नदीच्या किनारी वसले आहे. त्यामुळे बॅचलर पार्टी करण्यासाठी हे अगदी योग्य ठिकाण आहे. १५. Jaco, Costa Rica – Jaco या शहराला मोठा समुद्रकिनाला लाभला आहे. येथील निळाशार समुद्राची कायम तरुणाईला भूरळ पडते. त्यामुळे अनेक जण टूरसाठी या ठिकाणाला पसंती देतात. १६. टोकियो, जपान- टोकियो (Tokyo, Japan) जपानमधील सर्वात मोठं शहर आहे. खासकरुन हे शहर शॉपिंगसाठी ओळखलं जातं. येथील शाही महाल, टोकियो टॉवर,मीजी जिंगू श्राइन,अमेयोको ही पाहण्यासारखी ठिकाणी आहेत.शाही महाल हे जपानच्या राजाचे आधिकारिक निवास स्थळ आहे. या महालात जपानी परंपरा बघायला मिळतात. तर टोकियो टॉवर ३३३ मीटर उंच असून याहे टॉवर आयफेल टॉवरपेक्षा १३ मीटर उंच आहे. या टॉवरच्या आत मेणाचे संग्रहालय, एक गूढ रहस्यमय क्षेत्र आणि हस्तकला दालनही आहे. तसंच मीजी जिंगू श्राइन हे मंदिर शिंतो वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. १७. वर्झावा – वर्झावा (Warsaw, Poland) ही मध्य युरोपातील पोलंड देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. १८. अटलांटिक सिटी, न्यु जर्सी (Atlantic City, New Jersey) १९. न्युयॉर्क – न्युयॉर्क (New York City, New York) हे लोकसंख्येच्या दृष्टीने अमेरिकेतील सगळ्यात मोठे शहर आहे. न्युयॉर्क शहरातील अनेक ठिकाणं पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहेत. उदा. स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, टाइम्स स्क्वेअर, एम्पायर स्टेट बिल्डींग हे येथे पाहण्यासारखं आहे. २०. कँकून, मॅक्सिको (Cancun, Mexico) २१. तुलूम, मॅक्सिको (Tulum, Mexico) २२. पनामा सिटी, पनामा (Panama City, Panama) २३. हवाना, क्युबा (Havana, Cuba) -
२४. कार्टाजेना, कोलंबिया (Cartagena, Colombia)
२५. सॅन जुआन, पोर्तो रिको (San Juan, Puerto Rico) २६. सेंट मार्टीन, नेदरलँड (St Maarten, Netherlands)
