दोन भारतरत्नांची कृष्णकुंजवर भेट..
- 1 / 11
कला आणि खेळाची जाण असलेल्या एका राजकारण्याच्या घरी भेटीची झालेली ही देवाण-घेवाण सर्वच उपस्थितांना भारावून टाकणारी होती..कारण प्रथमच दोन भारतरत्ने भेट घेण्यासाठी एकत्र आली होती. (छायाः प्रदीप कोचरेकर)
- 2 / 11
भेट देणारे आणि घेणारे दोघेही आपल्या क्षेत्रात अढळपदी विराजमान झालेली 'भारतरत्ने' होती. भेट स्वीकारण्यासाठी त्यांनी निवडलेले ठिकाणही आगळेवेगळे होते. (छायाः पीटीआय)
- 3 / 11
लतादीदींच्या गाण्यांचा मी लहानपणापासून फॅन आहे. माझ्या म्युझिक रूममध्ये लतादीदींची स्वत:च्या वापरातील एखादी गोष्ट मला हवी होती, असे सचिनने सांगितले. (छायाः प्रदीप कोचरेकर)
- 4 / 11
कृष्णकुंजवर एकमेकांशी चर्चा करताना दोन भारतरत्नांचे टिपलेले छायाचित्र. (छायाः प्रदीप कोचरेकर)
- 5 / 11
अनोख्या भेटीमुळे दोन भारतरत्ने एकत्र आली हा माझ्यासाठी आनंदयोग असल्याचे राज म्हणाले. (छायाः प्रदीप कोचरेकर)
- 6 / 11
लतादीदी या मला आईसारख्या असल्याचे सांगून आपला स्वाक्षरी असलेला टी शर्ट सचिनने त्यांना दिला. (छायाः प्रदीप कोचरेकर)
- 7 / 11
सचिनच्या नव्या घरातील म्युझिक रूममध्ये लता मंगेशकर यांची एखादी आठवण त्याला हवी होती. राज यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि लतादीदींनी स्वत: लिहून गायलेल्या गाण्यांचा कागद एका सुंदर फ्रेममध्ये गुंफू ला. 'तू जहा, जहा चलेगा,' आणि 'पियां तोसे नैना' ही लतादीदींच्या हस्ताक्षरातील गाणी सचिनच्या म्युझिक रुममधील भिंतीवर विराजमान होणार आहे. (छायाः प्रदीप कोचरेकर)
- 8 / 11
या कार्यक्रमानंतर राज यांनी सचिन व लतादीदींचा शाल देऊन सत्कारही केला. (छायाः प्रदीप कोचरेकर)
- 9 / 11
सचिनला शाल देऊन त्याचा सत्कार करताना राज ठाकरे. (छायाः प्रदीप कोचरेकर)
- 10 / 11
मनसेच्या आठव्या वर्धापन दिनीच झालेला अनोखा कार्यक्रम कायम स्मरणात राहणार असल्याचे राज म्हणाले. (छायाः प्रदीप कोचरेकर)
- 11 / 11
लता मंगेशकर यांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. तर राज ठाकरे यांनीही रविवारीच मोदींना पाठिंबा दर्शविला. सचिन तेंडुलकर राज यांच्या निवासस्थानी लतादीदींची भेट स्वीकारण्यासाठी आला. यामुळे सचिनही याच वाटेने जाणार की काय, अशी शंका काँग्रेसच्या वर्तुळात घेतली जाऊ लागली. (छायाः पीटीआय)